मुखेड तालुक्यातील वाहनचालकाच्या खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:28+5:302021-07-07T04:25:28+5:30

पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (वय ३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्या उदगीर शहरात ...

Murder of a driver in Mukhed taluka revealed | मुखेड तालुक्यातील वाहनचालकाच्या खुनाचा उलगडा

मुखेड तालुक्यातील वाहनचालकाच्या खुनाचा उलगडा

पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (वय ३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्या उदगीर शहरात वास्तव्याला हाेते. १६ जूनराेजी दुपारी निलंगा येथे भाडे घेऊन गेले हाेते. सायंकाळच्यासुमारास उदगीरकडे येत असताना वालांडी शिवारात त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला हाेता. वलांडीपर्यंत आहे, तासाभरात घरी येताे, असे कुटुंबीयांना बालाजी बनसाेडे यांनी आपल्या माेबाईलवरून सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांचा आणि कुटुंबीयांचा संकर्प तुटला. रात्रभर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी शाेधाशाेध केली असता, वालांडी शिवारात सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवणी पाेलीस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. अज्ञातांनी त्यांचा खून करून वाहनही पळविले हाेते. याबाबत पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तीन आठवड्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हेळंब येथील विकास रघुनाथ सूर्यवंशी (वय २९) आणि ज्ञानेश्वर भारत बाेरसुरे (२१) या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच दाेघांनीही खून केल्याची कबुली दिली.

हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजनान भातलवंडे, पाेलीस निरीक्षक कामठेवाड, सपाेनि. सुधीर सूर्यवंशी, पाेउपनि. संजय भाेसले, सपाेउपनि. खान, राजेंद्र टेकाळे, रामहरी भाेसले, राहुल साेनकांबळे, सदानंद याेगी, याेगेश गायकवाड, सिचन धारेकर, चालक जाधव यांच्या पथकाने केला.

समाेर येऊन वाहन अडविले...

आरोपी विकास आणि ज्ञानेश्वर हे देवणी तालुक्यातील हेळंब पाटी येथे सायंकाळच्यासुमारास थांबले हाेते. उदगीरकडे जायचे आहे, म्हणून त्यांनी रस्त्यावर आडवे येत चालक बालाजी बनसाेडे यांचे वाहन अडविले. याच कारणावरून त्यांच्यात आणि चालक बालाजी बनसाेडे यांच्यात वाद झाला. यातूनच आम्ही डाेक्यात दगड घालून चालकाला गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग उचलून वलांडी शिवारातील शेताच्या बांधालगत टाकून दिले. त्यानंतर माेबाईल, ओळखपत्र, पैशाचे पाकीट व वाहन घेऊन फरार झालाे, अशी कबुली आराेपींनी दिली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेला अखेर वाचा फुटल्याने दाेघांच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले.

Web Title: Murder of a driver in Mukhed taluka revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.