खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; रोहनच्या खुनप्रकरणी एकजण पुण्यातून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 17:15 IST2022-01-25T17:15:25+5:302022-01-25T17:15:54+5:30
आपले भांडण मिटले असून, आपण दाेघे मित्र आहाेत, असा विश्वास मित्राने दिला हाेता.

खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; रोहनच्या खुनप्रकरणी एकजण पुण्यातून ताब्यात
लातूर : औसा तालुक्यातील लाेदगा येथील रहिवासी राेहन सुरेश उजळंबे (१९ रा. माेती नगर, लातूर) याचा रविवारी भरदिवसा काेत्याने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडली हाेती. पाेलिसांनी मंगळवारी सकाळी घटनेनंतर पसार झालेल्या मित्राला पुण्यावरुन लातुरात येणाऱ्या एका ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पाेलिसांनी सांगितले, राेहन उजळंबे हा इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत हाेता. दरम्यान, मित्र आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले हाेते. याच भांडणाचा राग मनात ठेवत मित्रानेच त्याचा खून केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आपले भांडण मिटले असून, आपण दाेघे मित्र आहाेत, असा विश्वास राेहन उजळंब याला मित्राने दिला हाेता. राेहनने आपल्या मित्राच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला आणि मनातील राग काढून टाकला. काही दिवसांपासून मारेकरी मित्र राेहनसाेबत गाेडीगुलाबीने राहत हाेता. राेहनलाही वाटले आपला झालेला वाद हा तात्कालीक हाेता. मात्र, मारेकरी मित्राच्या मनात भांडणाची खुन्नस कायम हाेती. याच रागातून राेहनचा खून करण्याचा विचार त्यांच्या मनात घाेळत हाेता. शेवटी रविवारी सकाळी भेटायचे आहे असे सांगून राेहनला घराबाहेर बाेलावून घेतले.
घटनेपूर्वी ते लातुरात विविध ठिकाणी माेटारसायकवरुन फिरत हाेते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दाेघेही विशाल नगरातील साई मंदिर चाैकात आले. यावेळी सहज बाेलत-बाेलतच साेबत आणलेल्या धारदार काेयत्याने फिल्मीस्टाईने राेहनच्या गळ्यावर, डाेक्यात आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हल्ल्यात राेहन गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर काेसळला. दरम्यान, शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. अखेर तिसऱ्या दिवशी पाेलिसांनी खूनप्रकरणातील आराेपी मित्राला ताब्यात घेतले आहे. शाळेच्या दाखल्यावरुन त्याचे वय समाेर येणार आहे.
मारेकऱ्याची साेलापूर, पुण्यात भटकंती...
घटनेनंतर मारेकरी मित्राने लातूर जिल्ह्याची हद्द ओलांडली. ताे साेलापूर, पुणे आणि इतर ठिकाणी पाेलिसांना गुंगारा देत भटकत राहिला. साेबतचा माेबाईलही मारेकऱ्याने स्विचऑफ केल्याचे पाेलिसांना आढळून आले. पाेलिसांची चार पथके मारेकऱ्याच्या मागावर हाेती. ताे पुण्यातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक