रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यात अर्धे गाढून घेऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:48+5:302021-07-17T04:16:48+5:30
राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील पानगाव रस्त्यापासून जाणारा अडीच किमीचा रस्ता घनसरगाव तांड्याला जातो. या रस्त्यावरूनच तळणी पाझर तलाव क्र. ...

रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यात अर्धे गाढून घेऊन आंदोलन
राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील पानगाव रस्त्यापासून जाणारा अडीच किमीचा रस्ता घनसरगाव तांड्याला जातो. या रस्त्यावरूनच तळणी पाझर तलाव क्र. १ ची वाहतूक आहे. तीन वर्षांपासून तलावातील मुरूम काढून नेण्यात येत आहे. सतत ओव्हरलोड वाहने धावत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीची वारंवार प्रहार संघटनेच्या वतीने मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख राजाभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली तालुका शाखेच्या वतीने मुरूम खोदून नेण्यात येत असलेल्या ठिकाणच्या खड्ड्यात अर्धे गाढून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल गोडभरले, राजेश चौथवे, एकनाथ काळे, राजाभाऊ देशमुख, गोविंद खानापुरे, भानुदास दाणे, व्यंकट जाधव, खंडू वैध, बळिराम महानुरे यांच्यासह घनसरगाव तांड्यावरील नागरिक सहभागी झाले होते.
पाच तासांनंतर आंदोलन मागे...
सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात झाली. दुपारनंतर मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी रस्ता मजबुतीकरण करावे. अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या मांडल्या. प्रशासनाने त्या लवकरच सोडविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पाच तास आंदोलन झाले.
.
साेबत फोटो...
१६ एलएचपी रेणापूर- रेणापूर तालुक्यातील तळणी पाझर तलाव क्र. १ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने रस्त्याचे मजबुतीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी खड्ड्यात अर्धे गाढून घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.