बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:49+5:302021-07-15T04:15:49+5:30

... धामनगाव येथे प्रशासकांचा सत्कार जळकोट : कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय मुख्य प्रशासक अर्जुन आगलावे- पाटील व इतर ...

Movement of Bahujan Karmachari Sangh | बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन

बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन

...

धामनगाव येथे प्रशासकांचा सत्कार

जळकोट : कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय मुख्य प्रशासक अर्जुन आगलावे- पाटील व इतर प्रशासकांचा धामनगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य प्रशासक अर्जुन पाटील आगलावे, मन्मथप्पा किडे, श्रीकृष्ण पाटील, गजानन दळवे पाटील, दिलीप कांबळे, गोविंदराव माने, सत्यवान पाटील, संग्राम पाटील, उस्मान मोमीन यांचा सत्कार झाला. याप्रसंगी सरपंच सुनीता कल्पले, चेअरमन बापूराव आगलावे, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.

...

जुनी हक्क पेन्शन संघटना जिल्हाध्यक्षपदी केंद्रे

जळकोट : तालुक्यातील मंगरुळ येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयातील सहशिक्षक हणमंत केंद्रे यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शिवराम घोती, राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, तेजराम बांगड, गजानन टांगले, महेशकुमार तांदळे, तालुकाध्यक्ष गणेश मरेवाड यांनी केले आहे.

Web Title: Movement of Bahujan Karmachari Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.