अहमदपुरात माकडांचा उच्छाद, नागरिकांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:14+5:302021-07-30T04:21:14+5:30

शहरातील लेक्चर कॉलनी, टेंभुर्णी रोडवरील गणेश नगर, सैनिक काॅलनी येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी घराच्या ...

Monkeys abound in Ahmedpur, atmosphere of fear among the citizens | अहमदपुरात माकडांचा उच्छाद, नागरिकांत भीतीचे वातावरण

अहमदपुरात माकडांचा उच्छाद, नागरिकांत भीतीचे वातावरण

शहरातील लेक्चर कॉलनी, टेंभुर्णी रोडवरील गणेश नगर, सैनिक काॅलनी येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी घराच्या संरक्षण भिंतीवर माकडे वावरत आहेत. घराचा दरवाजा उघडा दिसला की, अचानक घरात प्रवेश करून खाण्याची दिसेल ती वस्तू बिनधास्त घेऊन जातात. कोणी त्यास विरोध केला तर अंगावर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बालकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. त्यामुळे माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. सतीश केंद्रे, मनोहर पाटील, गोविंदराव गिरी, मीनाक्षीताई शिंगडे, आर. जी. कांबळे, प्रवीण शिंगडे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शरद कांगणे, प्रा. अनिल मुंडे, शिवराज शेळके, राघवेंद्र गादेवार, बाशिदखाॅ पठाण, रवी महाजन, गोविंदराव गिरी, महेश लोहारे, शिवकुमार उडगे, आर. जी. कांबळे, सुप्रिय बनसोडे, रमेश कांबळे, सुजित गायकवाड, पांडुरंग केंद्रे, गजानन नखाते, सिद्धेश्वर गुट्टे, अनुराधा केंद्रे, शिवगंगा गवळे, नितीन नारागुडे, जी. वाय. गायकवाड, वसंत तिडोळे, निरज लाटकर, जी. टी. घोगरे, बी. डी. शेकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Monkeys abound in Ahmedpur, atmosphere of fear among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.