शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोदी स्टेजवर उद्धव ठाकरेंचा हातात हात धरूनच आले, 'छोटा भाऊ' म्हणाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:00 IST

एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. 

औसा - महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा यांच्यात युतीत अनेकदा मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यांच्यातून युतीत अनेक ठिणग्या पडल्याचं दिसून आलं आहे. एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. 

यावेळी सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आगमन झाले. तेव्हा व्यासपीठावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा हात हातात घेत व्यासपीठावर एन्ट्री केली. त्यामुळे मागील साडेचार वर्षात शिवसेना-भाजपामधलं सुरु असलेलं भांडण आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं बोललं जातंय. 

मात्र महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे असे शिवसेना नेते छातीठोकपणे सांगत असतात, भाजपाचे नेतेही राज्यभरात आम्ही मोठे भाऊ म्हणून प्रचार करतात. अशातच आज व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र भाई असा उल्लेख करुन केली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात भाषणात माझा छोटा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.  

लातूर येथे महाआघाडीच्या सभेनिमित्त अनेक दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. युती जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकेचे बाण चालवण्यात येत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी भाजपा-शिवसेनेने आपापसातले वाद मिटवत पुन्हा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. विरोधकांवर शिवसेना-भाजपाच्या युतीवर तोंडसुख घेतले. 

या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या संकल्पपत्राचं कौतुक करत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये जी वचनं दिली गेली आहेत तीच वचनं आणि त्याच कारणांसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी झाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर आधीचे सरकार अतिरेक्यांसमोर किंबहुना दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारे होते, पण आजचं आपलं हे सरकार पाकिस्तानने जर का कुरापत काढली तर नुसते बोलत नाही तर पाकिस्तानला ठोकतो आणि ठोकणारचं असं सांगत उद्धव ठाकरेंनी तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019