औसा-उस्मानाबाद रोडवर मनसेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:18 IST2021-12-31T16:17:43+5:302021-12-31T16:18:14+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक

औसा-उस्मानाबाद रोडवर मनसेचे रास्ता रोको आंदोलन
उजनी (जि.लातूर) : औसा तालुक्यातील लातूर ग्रामीणमधील २६ गावे औसा उपविभागातून मुरुड उपविभागाकडे हस्तांतरित करण्याचा पारीत केलेला आदेश रद्द करावा. कसलीही पूर्वसूचना न देता या भागातील शेतक-यांच्या शेतातील शेती पंपाचा खंडित करण्यात आलेला विज पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा, या प्रमुख मागणीकरिता शुक्रवारी औसा-उस्मानाबाद राज्यमार्गावर शिवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी शिवलीचे सरपंच सुधाकर खडके, टाक्याचे उपसरपंच अतुल शिंदे, धनराज गिरी, दाजी देवशिंगकर, समाधान जोगी, गुणवंत लोहार, मनसेचे महेश बनसोडे, जीवन जंगाले, राजेंद्र कांबळे, ज्ञानेश्वर गरड, तानाजी गरड, नवनाथ कुंभार, संतोष कोल्हापुरे, बाळू सोलाने, गोविंद चव्हाण, नितीन गरड, प्रहारचे तालुकाध्यक्ष सयाजी पाटील, चंद्रकांत गरड, सुरेश चव्हाण, नागनाथ हिप्परकर, अमोल पाटील, गोपाळ पाटील, संतोष कुरे, मारुती शिरसागर, लक्ष्मण सुरवसे, सदाशिव जाधव, ज्ञानेश्वर फुटाणे, सुरेश वाघमारे, दयानंद शिंदे, अच्युत ईरपे, राजाराम चिखले, समाधान खडके, रामहरी डिगे, गजानन ईरपे, गुणवंत कुंभार आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.