कीर्तनकाराचा मुलगा आमदार हाेणे ही सांप्रदायासाठी गाैरवाची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:34+5:302021-01-03T04:20:34+5:30
‘नववर्षाचे स्वागत आध्यात्माच्या सानिध्यात’, या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूरच्यावतीने १ जानेवारी रोजी औसा येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख ...

कीर्तनकाराचा मुलगा आमदार हाेणे ही सांप्रदायासाठी गाैरवाची बाब
‘नववर्षाचे स्वागत आध्यात्माच्या सानिध्यात’, या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूरच्यावतीने १ जानेवारी रोजी औसा येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ. अभिमन्यू पवार, गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदोरीकर महाराज म्हणाले की, राजकारण आणि सांप्रदाय ही दोन्ही टोके विरोधाची आहेत; मात्र आ. अभिमन्यू पवार यांनी राजकारण आणि सांप्रदायाचा पिढीजात संबंध घालून दिला आहे. एका सात्विक कुटुंबातील माणूस सात्विकच होतो, हे आमदार अभिमन्यू पवार यांनी दाखवून देत नववर्षाचे स्वागत आध्यात्माच्या सानिध्यात केले आहे. यामुळे कार्यकर्ते आणि तरुणांनी नववर्षाची सुरुवात निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून करावी. निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टीवर अतिक्रमण करू नका, गरिबांना दान करा, दान करण्याने धन शुद्ध होते. निरोगी शरीर हे भगवंतांनी दिलेली देणगी आहे. शेतकऱ्यांनी काळी आईची आणि भारतमातेची सेवा करावी. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, निरोगी व सशक्त शरीर हीच खरी संपत्ती आहे, असेही ते म्हणाले. कीर्तनाला फाउंडेशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.