अल्पवयीन मुली ‘लाॅक’;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:33+5:302021-06-26T04:15:33+5:30
राजकुमार जाेंधळे । लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील ...

अल्पवयीन मुली ‘लाॅक’;
राजकुमार जाेंधळे ।
लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये बेपत्ता हाेण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, काेराेनाने अनेकांना घरातच जायबंदी केले आहे. २०१८ मध्ये १०१ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नाेंद जिल्ह्यातील त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या दप्तरी आहे. आता २०२० मध्ये हीच आकडेवारी ९३ च्या घरात आली आहे.
लातूर जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पाेलीस दलाच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध जाहीर करण्यात आले. या निर्बंधांना अधून-मधून शिथिलता देण्यात आली. परिणामी, याच काळात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. २०१८ मध्ये एकूण १०१ मुली बेपत्ता झाल्या असून, त्यातील ९९ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. तर २ मुलींचा शाेध लागला नाही. २०१९ मध्ये ९६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील ८२ मुलींचा शाेध लागला असून, १४ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. २०२० मध्ये एकूण ९३ मुली बेपत्ता असून, ८२ मुली सापडल्या आहेत. तर ११ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. जानेवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुली बेपत्ता असल्याचे समाेर आले आहे. यातील ४२ मुलींचा शाेध लागला असून, १६ मुली अजूनही बेपत्ता आहेत.
काेराेना काळात नियमांचे पालन व्हावे, यासाठी पाेलीस दल २४ तास कर्तव्यावर आहे. या काळात बेपत्ता झालेल्या बहुतांश मुलींचा शाेध लावण्यात आम्हाला यश आले आहे. हे प्रमाण जवळपास ८० ते ९० टक्क्यांच्या घरात आहे. यातील काही घटनात प्रेमप्रकरण हे कारण समाेर आले आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात स्वतंत्र अपहरणाचे गुन्हे दाखल असून, शाेधकार्य मात्र ८० टक्क्यांवर यशस्वी झाले आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर
८५ टक्के मुलींचा शाेध लावण्यात आले यश...
२०१८ मध्ये एकूण १०१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. यातील ९९ मुलींचा शाेध लागला असून, याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर आहे. केवळ २ टक्के मुलींचा शाेध अद्यापही सुरु आहे. २०१९ पासून अपहरण झालेल्या ९६ मुलींपैकी ८२ मुलींचा शाेध लागला आहे. हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे़ २०२० मध्ये तब्ब्ल ९३ मुली बेपत्ता,अपहरण झाले आहे. यातील ८२ मुलींचा शाेध लागला आहे. तर ११ मुलींचा पत्ताच लागला नाही. ही टक्केवारी ८५ टक्क्यांच्या घरात आहे. जाेनवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुलीं बेपत्ता झाल्या असून, ४२ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. उर्वरित १६ मुलींचा शाेध अद्यापही सुरुच आहे़ हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे. २०१८ पासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलींचा शाेध सुरुच आहे.
शाेधकार्यासाठी पाेलीस पथकांची नियुक्ती...
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर, तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाताे. तपासाची चक्रे गतिमान केली जातात. विशेष म्हणजे, एखादा धागा हाती लागला की शाेध घेणे अधिक सुलभ हाेते. बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून राहत नाहीत. काेणाला न सांगताही जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते़;मात्र ज्यांना सांगून जातात, संपर्कात असतात, त्या व्यक्तीने पाेलिसांना तातडीने माहिती दिली तर शाेध लावण्यात अडचणी येत नाहीत. यावर कधी-कधी उपाय म्हणून पाेलीस खाक्या दाखवावा लागताे.