लातूर जिल्ह्यात एमआयएमला खिंडार; जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 02:28 PM2021-10-14T14:28:13+5:302021-10-14T14:28:58+5:30

एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष आगामी नगरपालिका निवडणुकीवर असल्याचा दिसत आहे.

MIM Latur District President and MIM's Udagir Corporator's entry into NCP | लातूर जिल्ह्यात एमआयएमला खिंडार; जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर जिल्ह्यात एमआयएमला खिंडार; जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

उदगीर ( लातूर ) : लातूर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षासह उदगीर नगरपालिकेतील एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी (  MIM's  Corporator's entry into NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात आणखी इनकमिंग वाढेल असा राजकीय अंदाज आहे.   

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, जरगर शमशोद्दीन, शेख नूरजहाँ बेगम, शेख फय्याज, हाश्मी रेश्मा खतेजा या नगरसेवकांसह एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील नागराळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, समद शेख, अजीम दायमी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादीचे लक्ष नगरपालिकेवर 
एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष आगामी नगरपालिका निवडणुकीवर असल्याचा दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेला एकहाती ताब्यात घेण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे. ४४ सदस्य संख्या असलेल्या येथील पालिकेवर सध्या भाजपाची सत्ता आहे. पालिकेत भाजपा-२३,काँग्रेस-१४, एमआयएम- ७ तर राष्ट्रवादीचा एकही सदस्य नाही. यामुळे राष्ट्रवादीने येणारी निवडणूक गांभीर्याने घेऊन पक्षात इनकमिंग वाढवली आहे.

Web Title: MIM Latur District President and MIM's Udagir Corporator's entry into NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.