खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीचा वीज काेसळल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:11+5:302021-07-12T04:14:11+5:30

खुदावंदपूर गावातील भाग्यश्री भीमराव मेत्रे (२७) या आपली मुलगी वैशाली भीमराव मेत्रे (७) हिला सोबत घेऊन आपल्या शेतात खुरपणीसाठी ...

Mileki, who went for weeding, died due to power outage | खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीचा वीज काेसळल्याने मृत्यू

खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीचा वीज काेसळल्याने मृत्यू

खुदावंदपूर गावातील भाग्यश्री भीमराव मेत्रे (२७) या आपली मुलगी वैशाली भीमराव मेत्रे (७) हिला सोबत घेऊन आपल्या शेतात खुरपणीसाठी गेल्या होत्या. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. दोघी मायलेकी जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या हातात छत्री, स्टीलचे टिफीन बॉक्स होते तर मुलीच्या हातात स्टीलची कळशी होती. ज्याठिकाणी वीज पडली ती जागा मोकळी होती. आजूबाजूला कोणतेच झाड, झुडुपही नव्हते. स्टीलच्या धातूमुळे वीज पडली असावी, असा तर्क केला जात आहे. भाग्यश्री यांना आणखी दोन मुली व मुलगा आहे. पती भीमराव हे आपली दोन ते तीन एकर शेती सांभाळून इतर लोकांच्या जमिनी करून उदरनिर्वाह करत होते. आईच्या निधनामुळे तीन मुलांचे मातृत्व हरपले आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे पीएसआय नंदकुमार मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मायलेकींचे मृतदेह विच्छेदनासाठी भालकीच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Mileki, who went for weeding, died due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.