झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:15+5:302021-08-25T04:25:15+5:30
यावेळी सरपंच राणीताई भंडारे, ग्रा.पं सदस्य जयदेवी रटकले, नंदा गायकवाड, विजयमाला मरडे, वत्सला स्वामी, निर्मला स्वामी, सुवर्णा सोनकांबळे, संगीता ...

झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश
यावेळी सरपंच राणीताई भंडारे, ग्रा.पं सदस्य जयदेवी रटकले, नंदा गायकवाड, विजयमाला मरडे, वत्सला स्वामी, निर्मला स्वामी, सुवर्णा सोनकांबळे, संगीता पाटील, रुक्मीन डुबे, विजया कंजे, शिवगंगा बनाळे, चंद्रकला पंचगले यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या. यांना वलांडी येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रीन वलांडी टप्पा २ अंतर्गतच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फा लावण्यात आलेल्या व जिल्हा परिषद शाळेसमोर लावण्यात आलेल्या या वृक्षांना राखी बांधून हा रक्षाबंधनाच्या अनोखा उपक्रम पार पडला. वलांडी येथील महिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी वृक्षाला राखी बांधून वृक्ष चळवळ काळाची गरज असल्याचा संदेश दिला. हा उपक्रम समाजाला दिशादर्शक असल्याचे गटविकास अधिकारी
मनोज राऊत यांनी सांगितले.