महात्मा फुले महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:43+5:302021-08-27T04:23:43+5:30
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत भदाडे होते. यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामजी बोडके होते तर मार्गदर्शक म्हणून ...

महात्मा फुले महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत भदाडे होते. यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामजी बोडके होते तर मार्गदर्शक म्हणून प्रा. विष्णुदास पवार होते. कला शाखेत जागृती मारुती राजनाळे हिने ८९ टक्के गुण घेऊन प्रथम, गजानन मुंडे याने ८७ टक्के घेऊन द्वितीय आला. वाणिज्य शाखेत कोमल विजय बोडके हिने ८८ टक्के गुण घेऊन प्रथम, ऋतुजा शिवाजी नरपडवाढ हिने ८० टक्के गुण घेऊन द्वितीय आली. विज्ञान शाखेत प्रणय मुरलीधर आमले याने ९१.१६ टक्के गुण घेऊन प्रथम, प्रेमसागर बालाजी आबरबंडे व आदित्य गोविंदराव चाटे यांनी प्रत्येकी ९० टक्के गुण घेऊन द्वितीय आले आहेत.
यावेळी रामजी बोडके, प्रा. विष्णुदास पवार, प्राचार्य डॉ. भारत भदाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. दयानंद सूर्यवंशी यांनी, सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले. आभार प्रा. अभय गोरटे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. ज्ञानेश्वर मुळे, प्रा. राजीव गुट्टे, प्रा. विठ्ठल कबीर, प्रा. विक्रम गायकवाड आदी उपस्थित होते.