स्वामी विवेकानंद विद्यालयात गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:18+5:302021-07-20T04:15:18+5:30

मारुती सूर्यवंशी यांचा लातुरात सत्कार लातूर : येथील व्ही. एम. जी. उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक मारुती सूर्यवंशी यांच्या ...

Meritorious felicitation at Swami Vivekananda Vidyalaya | स्वामी विवेकानंद विद्यालयात गुणवंताचा सत्कार

स्वामी विवेकानंद विद्यालयात गुणवंताचा सत्कार

मारुती सूर्यवंशी यांचा लातुरात सत्कार

लातूर : येथील व्ही. एम. जी. उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक मारुती सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव गिते, प्राचार्य विद्याताई पाटील, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मंगेश सुवर्णकार, केंद्रप्रमुख नंदिनी कुंभार, सुरेखा चंदेले आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मारुती सूर्यवंशी यांनी सेवा काळात केलेल्या कार्याबद्दल शिक्षण समितीचे सदस्य मंगेश सुवर्णकार यांनी माहिती दिली. यावेळी मारुती सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने फळबाग रोपांचे वाटप

लातूर : आर्ट ऑफ लिव्हिंग आणि प्राकृतिक विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक महादेव गोमारे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. याचा परिणाम येथील पाणी, शेती व जनजीवनावर होत आहे. वातावरणातील बदलामुळे पावसाची अनियमितता व न परवडणारी शेती यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी मागच्या काही वर्षात आपले गावाकडून शहराकडे स्थलांतर करीत आहेत. या वातावरणातील बदल यावर मात करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याचे महादेव गोमारे यांनी सांगितले.

प्रज्ञाशोध परीक्षेत श्री केशवराज विद्यालयाचे यश

लातूर : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत श्री केशवराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गुणवंतांमध्ये ईश्वरी शिरूरे, ओमकार धुमाळ, भारत पाटील, पियूष चव्हाण यांचा समावेश आहे. यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आलुरकर, कार्यवाह नितीन शेटे, चंद्रकांत मुळे, डाॅ. हेमंत वैद्य, कल्पनाताई चौसाळकर, किरणराव भावठाणकर, प्रकाशराव जोशी, यशवंतराव तावशीकर, जितेश चापसी, आनंदराज देशपांडे, मुख्याध्यापक संजय विभूते, महेश कस्तुरे, दिलीप चव्हाण, संजय कुलकर्णी, संदीप देशमुख आदींनी कौतुक केले आहे.

प्रा. निशांक पिंपळे यांना पीएच.डी. प्रदान

लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या गणित विभागातील प्रा. निशांक सुधाकर पिंपळे यांना स्‍वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्‍या वतीने पीएच.डी प्रदान केली आहे. संशोधनासाठी उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेल्‍लाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिव छत्रपती शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. गोपाळरावजी पाटील, उपाध्‍यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्‍हाणे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. शिंदे आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Meritorious felicitation at Swami Vivekananda Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.