श्रीराम विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:55+5:302021-07-24T04:13:55+5:30
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. पंडितराव उगिले, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरूरे, सहसचिव विठ्ठलराव ...

श्रीराम विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. पंडितराव उगिले, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरूरे, सहसचिव विठ्ठलराव कटके, संचालक ओमप्रकाश गोडभरले, रविकांत अकनगिरे, अनिता भातिकरे, रेणापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद दरेकर, दासू राठोड, प्राचार्य बी. बी. कोल्हे, मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक सतीश गोडभरले, प्रा. भरत धायगुडे यांची उपस्थिती होती.
श्रीराम विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह ६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिवम पवार याने ९४ टक्के घेऊन प्रथम, सृष्टी महालिंग तोडकरी हिने ९३.४० टक्के घेऊन द्वितीय, श्रद्धा राजाभाऊ पवार हिने ९१.२० टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे, तसेच श्रद्धा भातिकरे, वेदिका अकनगिरे, सक्षम आकनगिरे, हिंदवी दरेकर, ऋतुमयी राऊत, असावरी बाळे, धीरज शिंदे, श्रावणी भातिकरे, पूजा विभीतकर, भक्ती पवार, माधवी राठोड, शेख उस्मान, नागेश वाघमारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना मामडगे, तोडक, कोष्टी, बोंबडे, कोतवाड, बबन, शिंदे, गायकवाड, मोटाडे, वेल्हाळे, बारस्कर, तोकले, भातिकरे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले. आभार सिद्धेश्वर मामडगे यांनी मानले.