शासकीय रुग्णालयात विनयभंग, डॉक्टरविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:51 IST2017-11-24T05:51:04+5:302017-11-24T05:51:15+5:30

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील एका डॉक्टरने रुग्णालयातल्याच एका २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

Mental misconduct in government hospital, crime against doctors | शासकीय रुग्णालयात विनयभंग, डॉक्टरविरूद्ध गुन्हा

शासकीय रुग्णालयात विनयभंग, डॉक्टरविरूद्ध गुन्हा

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील एका डॉक्टरने रुग्णालयातल्याच एका २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात डॉक्टराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोपचार रुग्णालयात गुजरात राज्यातील एक २७ वर्षीय डॉक्टर युवती कार्यरत आहे. कान, नाक, घसा विभागातील डॉ. गिरीश ठाकूर यांनी ‘तू खूप सुंदर आहेस, तू मला आवडतेस’ असे म्हणत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देऊनही सतत संपर्क साधून तिचा विनयंभग केला. दीड वर्षापासून ठाकूर यांच्याकडून तसे वर्तन होते, असे त्या डॉक्टर तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Mental misconduct in government hospital, crime against doctors