एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी पुणे अन् दयानंद महाविद्यालयाचा सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:38+5:302021-08-23T04:22:38+5:30
लातूर : उच्च शिक्षणातील बदलते नवतंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करून व विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्डपीस ...

एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी पुणे अन् दयानंद महाविद्यालयाचा सामंजस्य करार
लातूर : उच्च शिक्षणातील बदलते नवतंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करून व विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी पुणे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी स्कूलचे प्रमुख डॉ. सुनील कराड, प्रा. प्रकाश माईनकर, प्रा. नवनाथ जाधव, दयानंदचे उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. ललित ठाकरे, डॉ. ब्रिजमोहन दायमा, डॉ. रवींद्र सोळुंके, डॉ. विश्वनाथ मोटे आदींची उपस्थिती होती. या करारानुसार विद्यार्थ्यांना रोबोटिक डिझाइनमध्ये इंटरफेशिंग ॲण्ड प्रोग्रामिंगसाठी काम करता येणार आहे. शिक्षण, उद्योगातील चालू वापरावर विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान निर्माण करणे, रोबोटिक थ्रीडी प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टेचिंग उपलब्ध करणे, उद्योग क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचे ज्ञान देणे, नवनिर्मिती आणि फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम आदींचा या करारात समावेश आहे.