पानगावात वंचित हक्क आंदोलनचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:31+5:302020-12-30T04:26:31+5:30

... निलंग्यात समृद्धी शिंदेचा सत्कार निलंगा : बंगळुरू येथील महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने समृद्धी शिंदे हिचा मराठा सेवा ...

Meeting of deprived rights movement in Pangaon | पानगावात वंचित हक्क आंदोलनचा मेळावा

पानगावात वंचित हक्क आंदोलनचा मेळावा

...

निलंग्यात समृद्धी शिंदेचा सत्कार

निलंगा : बंगळुरू येथील महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने समृद्धी शिंदे हिचा मराठा सेवा संघाच्या निलंगा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एम. एम. जाधव, तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. हंसराज भोसले, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, पी. एस. सगरे, डी. एन. बरमदे, अजय मोरे, भास्कर यादव, महेश जाधव, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.

...

ग्रामपंचायतीतर्फे पाणी फिल्टर भेट

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील उजेड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्याला वॉटर फिल्टर भेट देण्यात आले. उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, पीएसआय मलय्या स्वामी, सरपंच हमीद पटेल, आबासाहेब पाटील, बीट जमादार एम. एन. कच्छवे, येडले, लतिफ सौदागर, मनोज मोरे, पोहेकॉ. बी.के. तपघाले, दयानंद वासुदेव, हणमंत पन्हाळे, हरिदास पाटील आदी उपस्थित होते.

...

अहमदपुरातील रस्त्यावर अतिक्रमणामुळे समस्या

अहमदपूर : शहरातील थोडगा रोड ते थोडगा चौक दरम्यान व्यापारी दुकाने असल्याने मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे सतत रेलचेल असते. या मार्गावर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली असल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. शहरातील बसस्थानकासमोरही वाहतुकीची सातत्याने समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

...

चाकूर- येरोळमोड मार्गावर बससेवा सुरु करा

चाकूर : एसटी महामंडळाने चाकूर- येरोळमोड मार्गावरील बससेवा बंद केल्याने या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता बससेवा पूर्ववत होत आहे. परंतु, या भागातील बससेवा सुरु नाही. सदरील मार्गावरुन बससेवा सुरु केल्यास कबनसांगवी, आंबेवाडी, उजळंब, कुंभेवाडी, नागेशवाडी, मांडुरकी, तीर्थवाडी येथील विद्यार्थी व प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Meeting of deprived rights movement in Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.