वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:22+5:302021-05-10T04:19:22+5:30
यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. उमेश कानडे, आदींनी कार्यशाळा आयोजनासाठी ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळेना !
यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. उमेश कानडे, आदींनी कार्यशाळा आयोजनासाठी पुढाकार घेतला. पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. धनंजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. चव्हाण यांनी उत्तरे दिली. आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भिसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ. हनुमंत किनीकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आयएमए लातूर शाखेचे कौतुक केले.
३२० वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग
या कार्यशाळेत लातूर, नांदेड, अंबाजोगाई, तळेगाव येथील जवळपास ३२० वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सध्याच्या परिस्थितीत ताणतणावापासून दूर राहणे योग्य असून, विविध छंद जोपासत व्यायाम करणे, मानसिक स्वास्थ्य निरोगी राखणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्र मानवाच्या जीवनाशी संलग्न असते. त्यामुळे तणावमुक्त राहून परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.