महापौरांनी साधला परदेशातील लातूरकरांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:13+5:302021-05-10T04:19:13+5:30
झोन मिटिंगद्वारे साधलेल्या या उपक्रमात दुबई, मस्कत, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यांनी कोरोना ...

महापौरांनी साधला परदेशातील लातूरकरांशी संवाद
झोन मिटिंगद्वारे साधलेल्या या उपक्रमात दुबई, मस्कत, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यांनी कोरोना उपाययोजनेबाबत सूचनाही मांडल्या. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. दुबईस्थित हरिश दुनाखे व जर्मनी येथील स्थायिक मनोज येलगट्टे यांनी पुढाकार घेतला. सातासमुद्रापार असूनदेखील या सर्वांचे लातूरशी घट्ट नाते जडले आहे. यातूनच अशा संकटकाळात त्यांनी आरोग्यसेवेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
या अनोख्या चर्चेमध्ये डॉ. नरेंद्र काळे, डॉ. सुजित निलेगावकर, डॉ. उन्मेष सेलूकर, डॉ. विष्णू बिराजदार, डॉ. अनय देशमुख, अर्चना अमलापुरे, डॉ. नामदेव सूर्यवंशी, नरेंद्र शिवणे, प्रमोद चिंचनसुरे, प्रवीण शास्त्री, संगीता शिंदे, शेखर जोशी, शुभांगी जोशी आदी सहभागी झाले होते.
जन्म आणि कर्मभूमीशी नाते
आपली कर्मभूमी आणि आपल्या कर्मभूमीला विसरू शकत नाही, या भावनेतून या मंडळींनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या माध्यमातून अद्ययावत माहिती, तंत्रज्ञान तसेच आर्थिक स्वरूपात मदत मिळू शकणार आहे. जगभरात वेळोवेळी होणारे बदल, आजाराचे बदलते स्वरूप आणि त्यावर केले जाणारे उपचार याबाबतही मार्गदर्शन होणार असल्याचे विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.