खरिपासाठी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST2021-05-24T04:19:03+5:302021-05-24T04:19:03+5:30
... पीकविमा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा व परिसरातील मिरगाळी, ...

खरिपासाठी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव
...
पीकविमा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात
कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा व परिसरातील मिरगाळी, हल्लाळी, ममदापूर, तांबाळा, चिलवंतवाडी, सरदारवाडी येथील शेतकऱ्यांनी गत खरिपात पीकविमा भरला होता. दरम्यान, अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसानही झाले. मात्र, अद्यापही पीकविमा परतावा न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने कृषिसेवा केंद्र सुरू करण्यास मुभा दिल्याने काही शेतकरी आतापासून बी-बियाणे, खतांची चौकशी करीत आहेत.
...
फिजिकल डिस्टन्सकडे नागरिकांचे दुर्लक्ष
रेणापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत कडक निर्बंध लागूच आहेत, तसेच प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्स राखावा. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.