शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक; अशी असेल मतदानाची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:01 IST

शिक्षकांना पसंती क्रमानुसार करता येणार मतदान

लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ४० मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. मतदाराला आपले मतदान पसंती क्रमांकानुसार करावे लागणार आहे. दरम्यान, मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय इतर पेन, पेन्सिल बॉल पॉइंट, पेन याचा वापर करता येणार नाही.

मतदाराने ज्या उमेदवारास पहिला पसंती क्रमांक देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम असे नमूद केलेल्या रकान्यात एक हा क्रमांक नमूद करून मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असेल, तरी एक हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली, तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तेवढे पसंती क्रमांक नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम दोन,तीन, चार इत्यादी अंक तुमच्या पसंती क्रमानुसार पसंतीक्रम या स्तंभामध्ये दर्शवावा.

कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करू नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. तो एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत दर्शवू नये. १, २, ३ इत्यादी असा दर्शवा. तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम या स्तंभामध्ये दर्शवावा. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरूपात असावा किंवा रोमन स्वरूपातील संविधानाच्या आठव्या सूचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरूपात नोंदविता येतील.

मतपत्रिकेवर स्वाक्षरी नको...मतपत्र किंवा स्वाक्षरी किंवा अद्याक्षरे किंवा कोणतेही शब्द नमूद करू नयेत, तसेच अंगठ्याचा ठसा उमटू नये, पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर कोणतीही खूण करू नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल, तुमची मतपत्रिका वैध उमेदवारांपैकी एकाच्याच नावासमोर एक हा अंक नमूद करून, तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरूपाचे असून, ते अनिवार्य नाहीत, असे जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी म्हटले आहे.

टॅग्स :laturलातूरMarathwadaमराठवाडाTeacherशिक्षकElectionनिवडणूक