मराठी विज्ञान परिषद; महाजन यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:33+5:302020-12-11T04:46:33+5:30
समाजात विविध प्रकारे विज्ञान रुजविणाऱ्या, विज्ञानाबद्दल सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने वार्षिक अधिवेशनात केला ...

मराठी विज्ञान परिषद; महाजन यांचा सन्मान
समाजात विविध प्रकारे विज्ञान रुजविणाऱ्या, विज्ञानाबद्दल सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने वार्षिक अधिवेशनात केला जातो. यावर्षी होणाऱ्या संमेलनात डाॅ. अजय महाजन यांची सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे कौतुक होत आहे.
मोफत मणक्याचे विकार उपचार शिबिर
लातूर : शहरातील राजीव गांधी चौक येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत मणक्याचे विकार उपचार शिबिर होणार आहे. या शिबिरात न्यूरोसर्जन डाॅ. हनुमंत किणीकर, डाॅ. नितीन बरडे, डाॅ. ऋषिकेश नलवाडे, डाॅ. शशिकांत कुकाले रुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत.
शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. कल्पना किणीकर, डाॅ. गणेश बेळंबे, डाॅ. अरविंद भातांब्रे, प्रदीप पाटील, सुधीर साळुंके, नवनाथ आल्टे, निशांत वाघमारे, शिवाजी सावंत, श्रीनिवास बदुरे, अमित शेळके, सतीश बदाम आदींनी केले आहे.