मांजरा धरण ७५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:09+5:302021-09-09T04:25:09+5:30

मांजरा पात्रात पाणी स्थिरावले... धनेगाव धरणाच्या खालील कळंब तालुक्यातील लासरा ते लातूर जिल्ह्यातील होसुरपर्यंत पाणी स्थिरावले आहे. लासरा, इस्थळ, ...

Manjara dam is 75 percent full | मांजरा धरण ७५ टक्के भरले

मांजरा धरण ७५ टक्के भरले

मांजरा पात्रात पाणी स्थिरावले...

धनेगाव धरणाच्या खालील कळंब तालुक्यातील लासरा ते लातूर जिल्ह्यातील होसुरपर्यंत पाणी स्थिरावले आहे. लासरा, इस्थळ, कानडी बोरगाव, टाकळगाव, कारसा, पोहरेगाव, साई, नागझरी हे सर्व बॅरेजेस पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे १४५ पेक्षा अधिक कि.मी पाणी नदीक्षेत्रात स्थिरावले आहे. बॅरेजेसमधील पाण्यावर २० हजार हेक्टर्स सिंचनाची सोय झाली आहे. या बॅरेजेसमधील पाणी काटकसरीने व जपून वापरल्यास पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरु शकते. सध्या मांजरा नदीला पूर असून, पुराच्या पाण्यात कासारखेडा येथील नदीपात्रातील महादेव मंदिराचा बराचसा भाग पाण्याखाली आला आहे.

हवामान खात्याचा आणखीन पावसाचा अंदाज...

लातूर २३.८, औसा २६.०, अहमदपूर ९८.१, निलंगा १७.०, उदगीर ३२.०, चाकूर २९.५, रेणापुर ३९.३, देवणी ५४.९, शिरुर अनंतपाळ २९.१, जळकोट ४८.० मि.मी. पाऊस सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे. जिल्ह्यात सकाळी आठवाजेपर्यंत सरासरी ३६.०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत ५९८.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यातील रेणा, व्हटी, साकोळ, मसलगा, घरणी, देवर्जन, तिरु या मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा मोठा संचय झाला आहे.

Web Title: Manjara dam is 75 percent full