महाराष्ट्र विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:37+5:302021-06-17T04:14:37+5:30
किल्लारी : येथील महाराष्ट्र विद्यालयातील ५ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ...

महाराष्ट्र विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
किल्लारी : येथील महाराष्ट्र विद्यालयातील ५ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाजी जगताप होते. यावेळी वसंत बिराजदार यांच्यासह पालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य सतीश भोसले यांनी केले. कार्यक्रमात संपदा बाबळसुरे, अर्चना कानडे, रितिका भोसले, वैभवी बिराजदार, श्रेयस हारणगुळे यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मनोज अडगळे, महादेव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य भोसले म्हणाले, शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या काळातही अथक परिश्रम घेऊन शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता कायम ठेवली आहे. सूत्रसंचालन प्रकाश सुभेदार यांनी केले तर पर्यवेक्षक श्रीकांत सोनवणे यांनी आभार मानले.