शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:36 IST

अपेक्षेप्रमाणे लातूर व लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसने राखली

- हणमंत गायकवाड

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत अपेक्षेप्रमाणे लातूर व लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसने राखली तर औसा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले़ दरम्यान, अहमदपूर व उदगीरमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी बळकट केली आहे़ 

सर्वाधिक लक्ष असलेल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुन्हा एकदा त्यांचे काका काँग्रेस उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला आहे़ मंत्रीपद मिळाल्यानंतरही मतदारसंघावर सतत लक्ष ठेवत पकड मजबूत केल्याने पालकमंत्र्यांची लढाई सोपी झाली़ तसेच परंपरागत काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या लातूर शहर मतदारसंघात पुन्हा अमित देशमुख यांची सरशी झाली आहे़ मतदानानंतर दोन दिवस राजकीय पंडितांनी सांगितलेले अंदाज चूक ठरवत देशमुख यांनी लातूरवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे़ तर अपेक्षेप्रमाणे लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे़

अहमदपूर, उदगीर मतदारसंघात भाजपची बंडाळी पराभवाला कारणीभूत ठरली़ अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील तर उदगीरमध्ये संजय बनसोडे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवानंतरही सतत ठेवलेला जनसंपर्क त्यांच्या कामी आला़ औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री आ़ बसवराज पाटील यांच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी जोरदार लढत दिली़ प्रचारात अटीतटीची दिसणारी निवडणूक निकालामध्ये भाजपच्या बाजूने सरकली़ 

ठळक मुद्दे 1भाजपने औसा मतदारसंघ शिवसेनेकडून स्वत:कडे घेत विजय खेचून आणला़ त्याच वेळी ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला देऊन भाजपतील प्रबळ दावेदारांचा हिरमोड केला़ परिणामी, सेनेपेक्षा नोटाला अधिक मते पडली़   2लातूर शहर मतदारसंघातील काँग्रेस पराभवाच्या चर्चेचा धुराळा निकालाने जमिनीवर आणला़ 3अहमदपूर मतदारसंघात भाजपत सर्वाधिक बंडाळी झाली़ राष्ट्रवादी बळकट झाली़4आ़ भालेरावांना बाजूला ठेवून उदगीरमध्ये नवखा उमेदवार देणे भाजपला महागात पडले़ 5औशात बंडखोरीनंतरही भाजपने यश मिळविले़ 

हे आहेत विजयी उमेदवार भाजप1. संभाजी पाटील निलंगेकर, निलंगा2. अभिमन्यू पवार, औसाकाँग्रेस1. अमित देशमुख, लातूर शहर2. धीरज देशमुख, लातूर ग्रामीणराष्ट्रवादी1. बाबासाहेब पाटील, अहमदपूर2. संजय बनसोडे, उदगीर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस