डॉ. वीर यांनी पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण परभणीच्या कृषी विद्यापीठातून पूर्ण केले. १९९६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी कक्ष अधिकारी पदावर यश संपादन केले. ग्रामविकास विभागात त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी गौरव केला होता. जलसंपदा विभागात अव्वर सचिव, महसूल व वनविभागात उपसचिव म्हणून आपल्या कामाची छाप पाडली. ते शिस्तप्रिय, कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. सध्या महसूल व वनविभागात त्यांना सहसचिव पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
कॅप्शन : लातूर तालुक्यातील भडी येथील रहिवासी डॉ. माधव वीर यांची महसूल व वनविभागात सहसचिव पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.