पशुधन पळविणारी टाेळी पाेलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:58+5:302021-02-16T04:20:58+5:30
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यात गत चार महिन्यांपासून पशुधन चाेरीच्या घटनांत वाढ झाली आहे. याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या ...

पशुधन पळविणारी टाेळी पाेलिसांच्या जाळ्यात
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यात गत चार महिन्यांपासून पशुधन चाेरीच्या घटनांत वाढ झाली आहे. याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस पथकाने या टाेळीचा माग काढला. दरम्यान, पाेलिसांनी सापळा लावत ३ फेब्रुवारी राेजी किशाेर सखाराम कांबळे, शरणकुमार नंदकुमार श्रीडाेळे (रा. बनशेळकी राेड, उदगीर), सुलेमान सलीम सय्यद (रा. किल्ला गल्ली, उदगीर), सद्दाम गूल रसूल कुरेशी (रा. हाळी ता. उदगीर), गाैसपाशा नबी शेख (रा. गंडीपेठ, हैदराबाद) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विविध ठिकाणाहून पळविण्यात आलेली ६ लाख १७ हजारांची जनावरे जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाइ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सपाेनि. घाडगे, पाेउपनि. पल्लेवड, नामदेव सारुळे, चंद्रकांत कलमे, माधव केंद्रे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नाना शिंदे यांच्या पथकाने केली.