वर्षभरापासून बंद असलेल्या पशुधन बाजाराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST2021-01-13T04:48:40+5:302021-01-13T04:48:40+5:30
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील वर्षभरापासून बंद असलेला पशुधन बाजार रविवारपासून पुन्हा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांमधून ...

वर्षभरापासून बंद असलेल्या पशुधन बाजाराला सुरुवात
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील वर्षभरापासून बंद असलेला पशुधन बाजार रविवारपासून पुन्हा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक किशोर जाधव यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सोमनाथ सांगवे, नीलेश अंजने, प्रवीण कोहाळे, सचिव मुस्ताक शेख, संतोष हुच्चे, ए. व्ही. शेख, वाशीम शेख, रावसाहेब पाटील, दीपक पाटील, उपसरपंच युवराज गायकवाड, किशोर भोसले, वल्लिखॉ पठाण, विजय भोसले, डॉ. नोग्जा, विनोद बाबळसुरे, रमेश हेळंबे, कमलाकर बाबळसुरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बिराजदार, विजय भोसले, बालाजी मस्के, विजय दुधभाते, मुस्सा कुरेशी यांच्यासह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.