औश्यातील पशुधन बाजार उद्यापासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:22+5:302021-06-16T04:27:22+5:30
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरविला जातो. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा ...

औश्यातील पशुधन बाजार उद्यापासून सुरू
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरविला जातो. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी व जनावरांच्या बाजारावर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे औसा बाजार समितीने जनावर बाजार बंद ठेवला होता. शासनाने निर्बंध शिथिल केल्याने औसा येथील जनावरांचा बाजार गुरुवारपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले यांनी दिली. या बाजारात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्य प्रशासक किशोर जाधव यांनी दिली.
नियमांचे पालन करावे...
बाजारातील सर्वांनी चेहऱ्यास मास्क लावावा. सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख यांनी केले आहे. तसेच या बाजारसाठी शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणावीत, असेही ते म्हणाले.