लोकसंख्येच्या आधारावर लिंगायत समाजाला सत्तेत वाटा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:14+5:302021-06-24T04:15:14+5:30
देवणी येथील तालुकास्तरीय लिंगायत मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन शिवयोगी श्री गुरु लिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती मनिप्र सिद्धलिंग ...

लोकसंख्येच्या आधारावर लिंगायत समाजाला सत्तेत वाटा द्यावा
देवणी येथील तालुकास्तरीय लिंगायत मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन शिवयोगी श्री गुरु लिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती मनिप्र सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागनाथअप्पा भुरके, चंद्रकांत काला पाटील, माणिकराव कोकणे, विश्वनाथ मिटकरी, सिद्रामप्पा पोपडे, सी. एम. बिराजदार, वैजनाथ अस्टुरे, हावगीराव पाटील, काशिनाथ गरिबे, ॲड. शेषराव बिराजदार, यशवंत पाटील यांची उपस्थित होते.
प्रा. बिराजदार म्हणाले, लिंगायत समाजाला आरक्षण देताना शब्द बदल करण्यात आला. वाणींना आरक्षण लागू केले जे पूर्वीचे होते. लिंगायत, हिंदू लिंगायत किंवा वीरशैव लिहिणाऱ्यांना आरक्षणापासून दूरच ठेवले. लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी एक ओळीचे शुद्धीपत्रक काढण्यास वेळ मिळाला नाही. लिंगायत आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत असताना ते दिले जात नाही, असेही ते म्हणाले. मेळाव्यामध्ये तालुका अध्यक्षपदी शेषराव मानकरी तर शहराध्यक्षपदी विजयकुमार लुले यांची निवड करण्यात आली. यावेळी अमरनाथ मुळे, बसवराज कोपरे, नीळकंठ शिवणे, एन. आर. स्वामी, अशोक कडादी, तानाजी पाटील, सुभाष शंकरे, विजय खिंडे, सुभाष शेरे, रमेश वेरुळे, महेश शेवाळे, जनकराज जिवणे, रमेश मनसुरे,
वैजनाथ कारामुंगे, बसवराज बुदे, उद्धव मलेशे, निलेश लांडगे, अमोल जीवने, मलिकार्जुन ईश्वरशेट्टे, प्रशांत बळते, राहुल बिराजदार, संदीप ईश्वरशेटे, रामराज मोरे, आनंद जीवणे, बसवराज हरनाळे, दीपक मळभगे,स्वप्नील बावगे, महेश रोटे, मनोज संते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत मोठेराव यांनी केले तर आभार सी. एम. बिराजदार यांनी मानले.