अंधोरीत विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:28+5:302021-06-27T04:14:28+5:30
अंधोरी येथे उपकेंद्र असूनही सतत वीज गूल होत आहे. नरवटवाडी रस्त्यावरील डीपीवरील सिंगल फेजचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे या ...

अंधोरीत विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
अंधोरी येथे उपकेंद्र असूनही सतत वीज गूल होत आहे. नरवटवाडी रस्त्यावरील डीपीवरील सिंगल फेजचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. तसेच बौद्ध स्मशानभूमीजवळील प्रभागाचा वीजपुरवठा बंद आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील डीपीचे सिंगल फेजचे दोन डबे जळाले आहेत. त्यामुळे गावास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सरपंच प्रदीप चौकटे यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
...
अंधोरीत जोरदार पावसाच्या सरी
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे शुक्रवारी सायंकाळी १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीन, मूग, उडदाच्या पेरण्या केल्या. ही पिके उगवली असून पाण्याची गरज आहे. परंतु, पाऊस नसल्याने चिंता व्यक्त होत होती. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.