शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, चिठ्ठी लिहून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 23:08 IST

सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला.

औसा : सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. तर तळणी येथील २२ वर्षीय सुमित सावळसुरे या तरूणानेही आरक्षणासाठी विष प्राशन केले. 

सेलू येथील नवनाथ माने यांनी गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मला तीन मुली व एक मुलगा असून, शिक्षणाचा मोठा खर्च आहे.  आम्हाला आरक्षण व सवलती नाहीत, तसेच शेतात विहीर आहे, पाणी आहे पण ते उपसण्यासाठी मोटार घ्यावी तर पैसे नाहीत. या विवंचनेत मी माझे आयुष्य संपवत आहे, असे या चिठ्ठीत म्हटले आहे. सदर चिठ्ठी व कुटुंबियांच्या माहितीवरुन पोलिसांत नोंद झाली आहे. 

युवकाची आत्महत्याऔसा तालुक्यातीलच तळणी येथील २२ वर्षीय सुमित विलास सावळसुरे या तरूणानेही दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते, त्यास उपचारासाठी लातूर येथील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली.  सुमितने बीएस्सी डीएमएलटी हा अभ्यासक्रम केला होता. तो नोकरीसाठी पुण्याला जावून आला. परंतु, त्याला रोजगार मिळाला नाही. याच विवंचनेत त्याने विषारी द्रव प्राशन केल्याचे त्याचे चुलते म्हणाले.  सुमितचा बळीही मराठा आरक्षणासाठी गेल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सुमितला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही कार्यकर्त्यांनी घेतला होता. दरम्यान, औसा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आरक्षणासाठी टाका येथील आठ युवकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा