विहिरीत पडलेल्या हरिणाचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST2021-01-15T04:16:50+5:302021-01-15T04:16:50+5:30

आटोळा येथील प्रल्हाद कलवले यांच्या शेतातील विहिरीमध्ये हरिण पडल्याची माहिती अरमान मुंजेवार यांनी सकाळी सरपंच रेणुका तोडकरी यांना ...

The life of a deer that fell into a well was saved | विहिरीत पडलेल्या हरिणाचे वाचविले प्राण

विहिरीत पडलेल्या हरिणाचे वाचविले प्राण

आटोळा येथील प्रल्हाद कलवले यांच्या शेतातील विहिरीमध्ये हरिण पडल्याची माहिती अरमान मुंजेवार यांनी सकाळी सरपंच रेणुका तोडकरी यांना दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाचे गोविंद माळी यांना कळविले. दरम्यान, पोलीस पाटील आणि गावातील ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीमध्ये हरिणाचे पिल्लू तळमळत होते. सदरील हरिणास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले.

वनविभागाचे कर्मचारी उद्धव देगणुरे आणि गावातील सोमनाथ गंगापुरे हे दोघे विहिरीमध्ये उतरले. त्यांनी त्या हरिणास दोरीने बांधून ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून वर काढले. यावेळी गावातील नागरिक सोमनाथ गंगापुरे, हावगीराव तोडकरी, संतोष कलवले, बिभिषण पांचाळ, प्रकाश बावगे, गंगाराम हाने, गणी दरोगे, निजाम पटेल, शिवा रावळे, चंद्रकांत पांचाळ, प्रमोद शिंदे, मोहन कलवले, धनाजी कलवले, प्रल्हाद कलवले, वनविभागाचे उद्धव देगणुरे, वैजनाथ धोंडापुरे यांची उपस्थित होते.

Web Title: The life of a deer that fell into a well was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.