जळकोटला लेंडी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:45+5:302021-08-23T04:22:45+5:30
जळकोट पंचायत समिती सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक ...

जळकोटला लेंडी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू
जळकोट पंचायत समिती सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक झाली. वेळी ते बोलत होते.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी भविष्याचा विचार करुन देगलूर तालुक्यातील लेंडी धरणातून शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगून नगरपंचायतीने सोलर पॅनलसाठी नियोजन करावे, सोलर पॅनल झाल्यास नगरपंचायतीचे वर्षाला २४ लाख रुपयांची बचत होणार आहे. शासनाने सन २०२१ रोजी आदेश काढले असून, शहरातील गरजू शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी पाच लाख ३४ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला माजी आ. गोविंद केंद्रे, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबीडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, बालाजी मालुसरे, शिवाजी परगे, शिवाजी डुकरे, रोहणी केंद्रे, अशोक केंद्रे, किसन बोधले, बालाजी तिडके, विश्वनाथ चाटे, माधव मोरे, भाऊराव कांबळे, दिलीप कसंबळे, नीलेश गडकर आदींची उपस्थिती हाेती.