‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला काेराळीत प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:59+5:302021-02-14T04:18:59+5:30
शनिवारी कोराळी येथे आयोजित विविध विकासकामांचा प्रारंभ आणि ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत ...

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला काेराळीत प्रारंभ
शनिवारी कोराळी येथे आयोजित विविध विकासकामांचा प्रारंभ आणि ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
औसा विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेचे प्रश्न सोडविले जातील. यासाठी सर्कलनिहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. यातून घरकुल योजना, श्रावण बाळ योजना, शिधापत्रिका यासह अन्य शासकीय योजना आणि त्याच्याशी संबंधित समस्या सोडविल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रातील शेवटच्या कोराळी गावातून करण्यात आला आहे. या भागाचा विकास करायचा असून, यादृष्टीने कासारसिरसीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहाेत, असे मा. अभिमन्यू पवार म्हणाले. कासारसिरसीला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून आपण मागणी केली आहे. जेव्हा महाराष्ट्रात नवीन तालुक्याची निर्मिती होईल, तेव्हा कासारसिरसी हा वेगळा तालुका होईल.
यावेळी कोराळीवाडी येथे सिमेंट रस्त्याचा प्रारंभ, कोराळी येथे सिमेंट व पेव्हरब्लॉक रस्त्याचा प्रारंभ, महादेव मंदिर सभागृहाचे उद्घाटन अशा विविध विकासकामांंचे उद्घाटन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वामन वाकडे, तहसीलदार गणेश जाधव, सपोनि. रेवण ढमाले, सरपंच विक्रम बिराजदार, संजय मनाळे, रवींद्र बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, व्यंकट माने, रावसाहेब आकडे, करिबेश्वर पाटील, कल्पना ढबिले, कल्पना गायकवाड, धोंडीराम बिराजदार, भास्कर पाटील, धर्मराज होळकुंदे, परमेश्वर बिराजदार, लाला शेख, गोरख होळकुंदे आदींसह नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते.