फिट लातूरसाठी धावले लातूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:40+5:302021-02-08T04:17:40+5:30
आयमॅथॉन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर व दहा किलोमीटरपर्यंत झाली. या स्पर्धेत जवळपास एक हजार ...

फिट लातूरसाठी धावले लातूरकर
आयमॅथॉन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर व दहा किलोमीटरपर्यंत झाली. या स्पर्धेत जवळपास एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील संयोजकांच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी-शर्ट आणि पदक देऊन तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आयएमएच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे घरात बसून असलेल्या स्त्री, पुरुष व तरुण-तरुणींना या स्पर्धेच्या निमित्ताने गुलाबी थंडीत रस्त्यावर उतरून मोकळा श्वास घेता आला.
मानसिक व शारीरिक आरोग्य फिट ठेवा, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, हिंमतराव जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, मनपा आयुक्त अमन मित्तल, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. हंसराज बाहेती, अभिजित देशमुख, विठ्ठल लहाने, प्रसाद उदगीरकर, योगेश कर्वा, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रवीण मुंदडा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, सचिन डॉ. चाँद पटेल, वूमेन्स विंगच्या जिल्हाध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी, सचिव डॉ. रचना जाजू, संयोजन समितीचे सचिव डॉ. अजय जाधव, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. आरती झंवर, डॉ. कांचन जाधव, डॉ. अय्याज शेख, डॉ. संतोष डोपे, डॉ. रमेश भराटे, प्रदीप नणंदकर, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सुरेखा काळे, डॉ. अशोक गानू, डॉ. मोहिनी गानू, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. राजेश पाटील, डॉ. दिनेश वर्मा, डॉ. राजेश दराडे आदींची उपस्थिती होती.