लातूरच्या आर्वी गटावर काँग्रेसचे वर्चस्व कायम, अहमदपुरात भाजप प्रवक्ते हाकेंच्या भावजय पराभूत!
By हरी मोकाशे | Updated: February 9, 2026 12:01 IST2026-02-09T12:00:44+5:302026-02-09T12:01:24+5:30
लातूर तालुक्यातील आर्वी गटावर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

लातूरच्या आर्वी गटावर काँग्रेसचे वर्चस्व कायम, अहमदपुरात भाजप प्रवक्ते हाकेंच्या भावजय पराभूत!
लातूर : जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस सोमवारी सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. लातूर तालुक्यातील आर्वी गटावर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री धनंजय देशमुख ह्या विजयी झाल्या आहेत. आर्वी गणात काँग्रेसच्या तनुजा बापू चव्हाण तर महापूर गणात काँग्रेसचे श्रीकांत माणिक बैले हे विजयी झाले आहेत.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गटात राष्ट्रवादी (शरद पवार) च्या शितल प्रदीपराव खोमणे ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या भावजय रेखाताई तरडे- हाके ह्या पराभूत झाल्या आहेत. खंडाळी गणातून भाजपच्या सुरेखा संतोष केंद्रे ह्या विजयी झाल्या आहेत.
रेणापूर तालुक्यातील पानगाव गटात मनसेचे सुनील नागरगोजे हे विजयी तर पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी प्रकाश गालफाडे, कोष्टगाव गणात मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी ह्या विजयी झाल्या आहेत.