लातुरात महिलेचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू, लातूर शहरातील सम्राट चौक येथील घटना

By संदीप शिंदे | Updated: December 18, 2023 10:25 IST2023-12-18T10:25:24+5:302023-12-18T10:25:59+5:30

एका दुचाकीवरील महिला ट्रॅव्हल्सखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

Latur woman crushed to death under travels, incident at Samrat Chowk in Latur city | लातुरात महिलेचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू, लातूर शहरातील सम्राट चौक येथील घटना

लातुरात महिलेचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू, लातूर शहरातील सम्राट चौक येथील घटना

 संदीप शिंदे 

लातूर : शहरातील सम्राट चौक येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. एका दुचाकीवरील महिला ट्रॅव्हल्सखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

एक महिला व मुलगा स्कुटीवरून सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जात होते. दरम्यान, सम्राट चौक येथे स्कुटी आणि समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक झाली. यामध्ये स्कुटीवरील महिला रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गांधी चौक पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मयत महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, सकाळी ९.२० वाजेपर्यंत गांधी चौक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Latur woman crushed to death under travels, incident at Samrat Chowk in Latur city