शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

Latur: ठाणे संघाने पटकावला रस्ता सुरक्षा चषक, बीड उपविजेता, ठाण्याचे मोहन शिंदे मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:21 PM

Latur: लातूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमएच २४ रस्ता सुरक्षा चषक क्रिकेट स्पर्धेत ठाणे संघाने बीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

- आशपाक पठाणलातूर : येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमएच २४ रस्ता सुरक्षा चषक क्रिकेट स्पर्धेत ठाणे संघाने बीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर बीडचा संघ उपविजेता ठरला आहे. मालिकावीर म्हणून ठाण्याचे मोहन शिंदे, अंतिम सामन्यात ठाण्याचे प्रसाद नलावडे सामनावीर ठरले.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लातूर येथे दयानंद शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातील १४ जिल्ह्यातून प्रादेशिक परिवहन विभागाचे संघ सहभागी झाले होते. दोन दिवसीय स्पर्धेत अंतिम रविवारी ठाणे विरूध्द बीड यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून ठाण्याने फिल्डींग घेतली. बीडच्या संघाने ८ षटकात ७७ धावा काढल्या. त्यानंतर ठाणे संघाने तीन खेळाडू बाद झाल्यावर ७.२ षटकात सामना जिंकला. ठाण्याकडून कर्णधार प्रसाद नलावडे यांनी दोन षटकात ३ खेळाडू बाद केले. त्यामुळे त्यांना सामनावीर घोषित करण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज पवन गायके (बीड), उत्कृष्ट गोलंदाज महेश भोसले (बीड) यांनी कामगिरी केली. प्रतिनिधी संघात लातूरने धाराशिव संघाचा पराभव केला. विजेत्या संघाला लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विशेषत: सीटबेल्ट, हेल्मेट, वाहन चालविताना मोबाईल न बोलणे, खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांतून धोकादायक प्रवास आदी विषयक माहिती देण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन विजय भोये यांनी सांगितले.

चालकांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे...यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार म्हणाले, स्पर्धेत खेळत असताना जसे खेळाडून सुरक्षाविषक साधने वापरतात त्याचपध्दतीने रस्त्यावर वाहन चालवित असताना चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नियमांचे पालन केल्यास नक्कीच अपघात होणार नाहीत, पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहन देत असताना सर्व बाबींचा विचार करावा. वाहनांचा वेग मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :laturलातूरstate transportएसटी