राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी लातूरचा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:09+5:302021-02-11T04:21:09+5:30

लातूर : सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे होणाऱ्या वेट्रन्स राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी लातूरचा संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत राज्यातील ...

Latur team leaves for state cricket tournament | राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी लातूरचा संघ रवाना

राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी लातूरचा संघ रवाना

लातूर : सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे होणाऱ्या वेट्रन्स राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी लातूरचा संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत.

जाहीर झालेल्या संघात मदन रेड्डी (कर्णधार), शफी टाके (उपकर्णधार), जी. श्रीकांत, उल्हास भोयरेकर, सुशील सुडे, जया पवार, दिवाकर शेट्टी, संगीत रंदाळे, मोहसीन शेख, अशोक गडदे, अनिल तांदळे, गजानन वाघोलीकर, ईश्वर गुडे, किरण बडूरकर, डाॅ. जावेद सिद्दीकी, संतोष देवडे, चंद्रकांत नाईकनवरे, राजू शिंदे (राखीव) यांची निवड करण्यात आली आहे. व्यवस्थापकपदी समीर शर्मा, फिजिओ डाॅ. जिरे तर प्रशिक्षक म्हणून नरेंद्र पाटील काम पाहणार आहेत. निवड समिती अध्यक्ष सुहास पाचपुते, धर्मा आकनगिरे, सुहास अष्टुरे यांनी संघास शुभेच्छा दिल्या. या राज्य स्पर्धेत रणजी ट्राॅफीसह विविध माजी नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.

Web Title: Latur team leaves for state cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.