लातुरात साेयाबीनची आवक घटली, मात्र, भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:16+5:302020-12-07T04:14:16+5:30
लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात साेयाबीनला उच्चांकी दर मिळाला. त्यापाेठाेपाठ उदगीर येथील आडत बाजारातही साेयाबीनला ...

लातुरात साेयाबीनची आवक घटली, मात्र, भाव स्थिर
लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात साेयाबीनला उच्चांकी दर मिळाला. त्यापाेठाेपाठ उदगीर येथील आडत बाजारातही साेयाबीनला तब्बल ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला हाेता. लातूर आणि उदगीरच्या बाजारात साेयाबीनने यंदा भाव खाल्ला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच विक्रमी भाव मिळाला आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी शेतीमालाची आवक झाली असून, गव्हाची आवक १ हजार ४७९ क्विंटल झाली आहे. गव्हाला कमाल भाव २ हजार ३०० रुपयांचा मिळाला आहे. तर किमान १ हजार ५०६ आणि सर्वसाधारण प्रति क्विंटल २ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला आहे. ज्वारी हायब्रीड ८४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला कमाल १ हजार १०० रुपये, किमान दर ९५० रुपये तर सर्वसाधारण दर १ हजार रुपये मिळाला आहे. रबी ज्वारीला प्रतिक्विंटलला २ हजार ८०० रुपये, किमान १ हजार ४५० तर सर्वसाधारण दर २ हजार २०० रुपयांचा मिळाला. हरभऱ्याची ६१५ क्विंटल आवक झाली असून, कमाल दर ४ हजार ६१२ रुपये, किमान - ३ हजार ७२५ आणि सर्वसाधारण दर ४ हजार ४५० रुपयांचा मिळाला आहे. ५५५ क्विंटल मुगाची आवक झाली असून, प्रतिक्विंटल कमाल दर ७ हजार ७०१ रुपये तर किमान - ३ हजार ३०० रुपये आणि सर्वसाधारण दर ५ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला आहे. सर्वाधिक ३४ हजार ८८२ क्विटल साेयाबीनची आवक झाली आहे. शनिवारी साेयाबीनला प्रतिक्विंटल कमाल भाव ४ हजार १२८ रुपये तर किमान ३ हजार ८०० रुपये तर सर्वसाधारण ४ हजार ५० रुपयांचा दर मिळाला आहे.