लातुरात बियाणांची चाेरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: September 18, 2022 16:06 IST2022-09-18T16:06:18+5:302022-09-18T16:06:54+5:30

शहरातील मार्केट यार्ड परिसरात असलेले दुकान फाेडून अज्ञात चाेरट्यांनी सोयाबीन बियाणांच्या बॅगा लंपास केल्याची घटना घडली.

Latur seed robbery One and a half lakh worth of goods lost | लातुरात बियाणांची चाेरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

लातुरात बियाणांची चाेरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

लातूर :

शहरातील मार्केट यार्ड परिसरात असलेले दुकान फाेडून अज्ञात चाेरट्यांनी सोयाबीन बियाणांच्या बॅगा लंपास केल्याची घटना घडली. चाेरट्यांनी जवळपास १ लाख २६ हजारांचा मुद्देमाल पळिवला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सतीश माणिकराव देशमुख (वय ५७ रा. व्यंकटेश नगर, लातूर) यांचे कव्हा राेडवरील शिवनेरी प्रवेशद्वारासमाेर सतिश ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे आपले दुकान १ ते २ राेजीच्या रात्री बंद करुन घराकडे गेले हाेते. दरम्यान, ते दुकान अज्ञात चाेरट्यांनी फाेडून विविध कंपन्याचे साेयाबीन बियाणांच्या बॅगा असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. सकाळी दुकाना उघडताना आपले दुकान फाेडल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक काेल्हे करत आहेत.

Web Title: Latur seed robbery One and a half lakh worth of goods lost

टॅग्स :laturलातूर