शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

लातूर : क्लास संचालकाच्या हत्येप्रकरणी पाच जण गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 3:04 PM

खासगी क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लातूर  - खासगी क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा (35 रा. कुमार मॅथस् लातूर संचालक) यांच्यासहीत अक्षय भिवा शेंडगे  (21), शरद सूर्यकांत घुमे (29 ), करण चंद्रपालसिंग गहिरवार  (26 ) आणि महेशचंद्र प्रभाकरराव गोडगे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. तर 10 लाख रुपये मारेक-याला देण्यात आले होते. हत्या करण्यासाठी देशी पिस्टलचा गुन्ह्यात वापर आल्याची माहिती समोर आली आहे.  गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले रोख 2 लाख 31 हजार रुपये, 13 जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन व एक पिस्टल, दुचाकी असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांनी दिली.

नेमके काय आहे प्रकरण?

‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी (24 जून) मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार उच्चभ्रू वसाहत असलेल्या महसूल कॉलनीतील मुख्य रस्त्यावर घडला. अविनाश चव्हाण (वय ३६) यांनी शिक्षकांची नेमणूक करून स्टेप बाय स्टेप हा कोचिंग क्लास लातूर येथे सुरु केला होता. दरम्यान, रविवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या साईधाम येथील घराकडे कारने एकटेच निघाले होते. अगदी घराच्या जवळ महसूल कॉलनीतील शाळेजवळ रस्त्यावरच अज्ञात मारेक-यांनी त्यांना गाठले व दोन गोळ्या झाडल्या. पहिला वार निकामी गेला. मात्र दुसरी गोळी अविनाश चव्हाण यांच्या छातीत घुसली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Murderखूनlaturलातूर