शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

​लातूर मनपा निवडणूक: पहिल्या चार तासांत १८.२२ टक्के मतदान; प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:02 IST

​प्रभागनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग क्रमांक १८ मध्ये मतदारांनी सर्वाधिक उत्साह दाखवला असून तिथे २३.९६ टक्के मतदान झाले आहे.

​लातूर: लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या चार तासांच्या टप्प्यात, म्हणजेच सकाळी ११.३० वाजेपर्यंत संपूर्ण शहरात सरासरी १८.२२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

​शहरातील १८ प्रभागांमध्ये एकूण ३,२१,३५४ मतदार असून सकाळच्या सत्रात ५८,५३९ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३२,०६४ पुरुष आणि २६,४७५ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 'इतर' प्रवर्गातील एकाही मतदाराची नोंद या चार तासांत झालेली नाही.

​प्रभागनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग क्रमांक १८ मध्ये मतदारांनी सर्वाधिक उत्साह दाखवला असून तिथे २३.९६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल प्रभाग ५ मध्ये २१.३९ टक्के आणि प्रभाग १ मध्ये २१.२६ टक्के मतदान नोंदवले गेले. दुसरीकडे, प्रभाग ११ मध्ये सर्वात कमी म्हणजेच १४.३४ टक्के मतदान झाले असून, प्रभाग ३ मध्येही १४.७९ टक्क्यांसह मतदानाचा वेग काहीसा संथ पाहायला मिळाला.

​सकाळच्या वेळी उन्हाचा कडाका कमी असल्याने अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी प्राधान्य दिले. दुपारच्या सत्रात उन्हामुळे गर्दी काहीशी कमी होण्याची शक्यता असली, तरी सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Election: 18.22% Voting in First Four Hours

Web Summary : Latur recorded 18.22% voter turnout in the initial four hours of municipal elections. Ward 18 saw the highest participation at 23.96%. Over 58,539 citizens voted, including 32,064 men and 26,475 women. Authorities anticipate increased voting percentage later in the day.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६