Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी
By आशपाक पठाण | Updated: October 28, 2023 19:15 IST2023-10-28T19:15:03+5:302023-10-28T19:15:28+5:30
Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी
- आशपाक पठाण
लातूर - मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.
नागझरी येथे सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागझरी येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात नागझरी, जेवळी, टाकळी, रायवाडी, इंद्रठाणा, सांगवी, भोईसमुद्रगा, वरवंटी, हरंगुळ(खु), साई, दर्जीबोरगाव आदी गावांतील तरुणांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.