Latur: नातीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, पळून गेलेल्या ट्रकचालकास पकडले
By आशपाक पठाण | Updated: March 18, 2024 22:17 IST2024-03-18T22:17:10+5:302024-03-18T22:17:59+5:30
Latur News: नातीच्या भेटीसाठी निघालेल्या एका वृध्द महिलेला लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर भरधाव निघालेल्या ट्रकचा पाठलाग करून सदरील ट्रक पकडण्यात आला.

Latur: नातीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, पळून गेलेल्या ट्रकचालकास पकडले
- आशपाक पठाण
लातूर - नातीच्या भेटीसाठी निघालेल्या एका वृध्द महिलेला लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर भरधाव निघालेल्या ट्रकचा पाठलाग करून सदरील ट्रक पकडण्यात आला. त्यानंतर चालकास मुरूड पोलिसांनी ताब्यात घेतले.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी असलेल्या शेषाबाई सहाणे (वय ७०) या आपल्या नातीला भेटण्यासाठी लातूर तालुक्यातील सारसा येथे निघाल्या होत्या. तांदुळजा येथील चौकात रांजणी येथून मळी घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरून गेलेल्या चालकाने ट्रक घटनास्थळी न थांबवता तसेच पुढे निघून जात होता. दरम्यान, तांदुळजा चौकातील काही तरूणांनी ट्रकचा पाठलाग केला. शिवाय, पुढे गाधवड येथेही संपर्क करून अपघाताची माहिती देण्यात आली. वाटेतच पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. अपघातात मयत झालेल्या महिलेस तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आलेवार म्हणाले, अपघात प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू आहे