शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: January 24, 2023 19:12 IST

पाेलिसांच्या हाती लागला २० टक्केच मुद्देमाल...

- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चाेरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यात चाेरट्यांनी तब्बल ८३९ घरांवर डल्ला मारला. यामध्ये राेकड, साेन्या- चांदीच्या दागिन्यांसह काेट्यवधींचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, एकूण घरफाेड्यापैकी केवळ २३६ घरफाेड्यांचा उलगडा करण्यात यश आले. मात्र, केवळ २५ टक्केच मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागल्याची माहिती समाेर आली आहे.

लातूरसह जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायाबराेबरच इतर गुन्ह्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. याला चाप लावण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी विशेष माेहीम सुरू केली आहे. शिवाय, त्या- त्या पाेलिस ठाण्यांच्या प्रमुखांना ‘ग्रुप काॅल’वर आदेशही दिले आहेत. अवैध दारू विक्री काही प्रमाणात थंडावली असली तरी घरफाेड्यांसह इतर चाेरीच्या घटना काही थांबता थांबत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

१२ काेटींच्या ऐवजावर चाेरट्यांनी मारला डल्ला...सन २०१९ मध्ये एकूण २२८ घरफाेड्या झाल्या असून, तीन काेटी ६३ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी पळविला. २०२० मध्ये २१० घरफाेड्या झाल्या असून, दाेन काेटी ५२ लाख ३६ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला. २०२१ मध्ये १९६ घरे चाेरट्यांनी फाेडली असून, दाेन काेटी ९८ लाख ८५ हजार ५२६ रुपयांचा ऐवज लंपास केला, तर डिसेंबर २०२२ अखेर जवळपास २०५ च्या घरात घरफाेडीचा आकडा आहे. यातही सरासरी तीन काेटींच्या आसपास ऐवज चाेरट्यांनी पळविला, अशी माहिती समाेर आली आहे.

हाती लागला केवळ सव्वा काेटींचा माल...गत चार वर्षांत जिल्ह्यात चारेट्यांनी ८३९ घरे फाेडून साेने, चांदी आणि राेकड असा जवळपास १२ काेटींवर मुद्देमाल चाेरून नेला आहे. पाेलिसांनी उघड केलेल्या २३६ घरफाेडीच्या गुन्ह्यात केवळ एक काेटी १३ लाख ७१ हजार ९९० रुपयांचाच मुद्देमाल हाती लागला आहे, तर ८० टक्के मुद्देमाल अद्यापही पाेलिसांच्या हाती लागला नाही. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी त्या- त्या ठाण्यांचे पथक प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर