Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By हरी मोकाशे | Updated: October 21, 2022 19:08 IST2022-10-21T19:07:44+5:302022-10-21T19:08:30+5:30
Farmer Death: निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
- हरी मोकाशे
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथील शेतकरी गोविंद प्रभाकर पोस्ते (४२) यांच्या औराद शहाजानी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २ हजार रुपये जमा झाले आहेत. ऐन दिवाळीत ही रक्कम खात्यावर जमा झाल्याने घरखर्च भागविता यावा म्हणून ही रक्कम उचलण्यासाठी ते येथील बँकेच्या शाखेतील रांगेत उभे होते. दरम्यान, त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.