लातूर : चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय आराेपीला लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा गुरुवार, ५ मार्च रोजी सुनावली.
औसा तालुक्यातील एका गावात ही घटना ११ जून २०२३ रोजी घडली असून, आरोपी विठ्ठल शिवाजी शिंदे (वय ६०) याने एका पाच वर्षीय मुलीला किराणा दुकानातून चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला विश्वासात घेत गावातील शाळेच्या पाठीमागे नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबात पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलिस ठाण्यात पोक्सो (बाल लैंगिक अत्याचा प्रतिबंध कायदा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रशांतसिंह राजपूत यांनी तपास करत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले. तपासाअंती न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान, लातूर येथील जिल्हा विशेष सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच आणि तपास अंमलदाराची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. जाधव यांनी आरोपी विठ्ठल शिंदे याला दोषी ठरवले. गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (ब) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
जिल्हा पाेलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचे कामकाज यशस्वी करण्यासाठी ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सपोनि. एस.व्ही. मनाळे, अंमलदार पंढरीनाथ सोमवंशी यांनी परिश्रम घेतले.
Web Summary : A 60-year-old man in Latur was sentenced to three years in prison for sexually assaulting a 5-year-old girl by luring her with chocolate. The court found him guilty under IPC Section 354 and the POCSO Act. Police investigation and witness testimony led to the conviction.
Web Summary : लातूर में एक 60 वर्षीय व्यक्ति को 5 वर्षीय बच्ची को चॉकलेट का लालच देकर यौन उत्पीड़न करने के आरोप में तीन साल की जेल हुई। अदालत ने उसे आईपीसी की धारा 354 और पोक्सो एक्ट के तहत दोषी पाया। पुलिस जांच और गवाहों के बयानों के आधार पर सजा सुनाई गई।